Saturday, January 2, 2010

देवाचा शोध कसा लागेल ?

देवाचा शोध कसा लागेल ?


आपण वेदांताच सखोल अध्ययन केलेले आहे. त्या वेदान्ताच्या परिभाषेत उत्तर देतो.

चित्ताचे तीन दोष आहेत. मल,विक्षेप, आवरण. हे तिन्ही दोष दूर होताच ईश्वराचा साक्षात्कार होतो.

  • ’मल’ याचा अर्थ धर्माविरुध्द वागण्याची इच्छा।
  • दुसरा दोष आहे ’विक्षेप’. धर्माचरण तर घडते आहे पण चित्त अशांत आहे, Restless आहे. बुध्दीचा निश्‍चय होत नाही.
  • आता तिसरा दोष आहे ’आवरण’. आवरण म्हणजे झाकण-पडदा. ’मी कोण आहे?’ मी शरीर नाही, मन नाही. तर मी साक्षी आहे. द्रष्टा आहे . अविनाशी आहे ही अनुभूति न येणे हेच आवरण.


आता हे दोष कसे दूर करायचे?

पहिला दोष ’मल’. मन ऐकत नसेल तर जबरीने त्याला स्वधर्माचरणात खेचून घेतले पाहिजे. धर्माचरण करायला लावले पाहिजे. इथे स्वत:चाच निश्‍चय हवा. स्वत:शिवाय अन्य कोणीही तुम्हाला जबरीने धर्माचरणात प्रवृत्त करू शकत नाही. धर्माचरण जसे जसे घडते तसा ’मल’ निवृत्त होत जातो. रजोगुण, तमोगुण मावळत जातो alertness सावधानता , सजगता चेतत जाते। ’मल’ हा दोष दूर होतो.

दुसरा दोष ’विक्षेप’! मन अस्थिर असते। चंचल असते. धर्माचरण घडूनहि विक्षेप ’जर्जर करतातच. हा दोष दूर करण्याकरता उपासना’ सांगीतली आहे. 'ऐकाग्रयर्थं उपासना'. उपासनेचा नित्य नेम कटाक्षाने सांभाळावा लागतो. त्यामुळे एकाग्रता साधत जाते. विक्षेप मावळत जातात.

तिसरा दोष ’आवरण’ हा आवरण दोष ’मी’ द्र्ष्टा आहे. 'चिदानंद रूप: शिवोहम।' अविनशी आहे. ’देह मी नाही’ , ही धारणा दृढावली की देहाच ममत्व दूर होते.Indifference अशी दृष्टी होते. अहंकार पूर्ण मावळत जातो . व्यावहारिक सत्ता ही जशी प्रतिभासीक सत्ता अस्तंगत करते. तसेच आता पारमार्थिक सत्ता ही व्यावहारिक सत्ता नाहीशी करते. साक्षित्वाची ही तुरीय अवस्था ! इथे तो साक्षात्कार होतो. सगुण आणि निर्गुणाचा साक्षात्कार होतो.

No comments:

Post a Comment